मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

बेसुमार चलनवाढीमुळे व्हेनेझुएलाची अर्थव्यस्था कोसळण्याच्या मार्गावर - २९ ऑगस्ट २०१८

बेसुमार चलनवाढीमुळे व्हेनेझुएलाची अर्थव्यस्था कोसळण्याच्या मार्गावर - २९ ऑगस्ट २०१८

* तेलाचे प्रचंड साठे असणारा व्हेनेझुएला देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक अवस्थेत आहे. देशातील लोकांकडे पोट भरण्यासाठी पैसे नाहीत. बेसुमार चलनवाढीमुळे ब्रेड, अंडे, विकत घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत.

* गेल्या वर्षभरात या देशातील लोकांचे सरासरी ११ किलो वजन कमी झाले आहे. देशातील लोक कचऱ्यामध्ये अन्न शोधून खाताना दिसतात. जिवंत राहण्यासाठी व्हेनेझुएलाच्या लाखो लोकांनी स्थलांतर केले आहे. सुमारे १० लाख लोक कोलंबियात राहत आहेत.

* बेसुमार चलनवाढ व्हेनेझुएलाचा प्रश्न आहे. चलनवाढीचा दर १० लाख टक्क्यावर पोहोचला आहे. कच्च्या तेलाचे दर कोसळल्यामुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहेच.

* ह्यूगो चावेज १९९९ साली व्हेनेझुएलाच्या सत्तेवर आले. त्यांनी कच्च्या तेलातून मिळालेल्या पैशातून गरिबांना मदत केली आहे. अन्न आणि औषधावर सबसिडी दिली. शिष्यवृत्त्या दिल्या. जमीन सुधारणा कायदा केले.  तेलाच्या पैशातून सर्व वस्तूची आयात सुरु केली.

* पुढे २०१३ मध्ये चावेज यांचे कॅन्सरने निधन झाले. त्यानंतर लगेचच तेलाचे भाव कोसळले तेलाचे भाव कोसळल्याने पैसे कमी मिळू लागले. आयात करण्याची क्षमता कमी झाली.

* चलनाला अर्थच राहिला नाही - व्हेनेझुएलाचे नवे चलन बाजारात आणायचे निश्चित केले. सध्या कोसळलेल्या बोलीवर चलनामधील शेवटचे तीन शून्य काढून टाकण्याचा निर्णय निकोलस मडुरो यांनी घेतला आहे. आता पाच शून्ये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  असे केल्यामुळे चलनवाढीशी लढा थोडा सोपा होईल. असे मडुरो यांना वाटते.

* गुन्हेगारी वाढली - व्हेनेझुएलामध्ये गरिबी आणि बेरोजगारीमुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात २७ हजार लोकांच्या हत्या झाल्या. श्रीमंतावरच प्रामुख्याने हल्ले होत आहेत. हत्याही त्यांच्याच होत आहेत. त्यामुळे श्रीमंतांना अधिक काळजी घ्यावी लागत आहे.

* गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ ५०% आयातच त्या देशाला करता आली. पण रुपयाची घसरण मात्र प्रचंड होत गेली. व्हेनेझुएलाचे मासिक वेतन आज केवळ १ डॉलर एवढे घसरले आहेत. त्यामुळे सध्या गरजा भागविणे कमी झाले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.