मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

देशात सौरऊर्जा निर्मितीत गुजरात अग्रेसर - ८ ऑगस्ट २०१८

देशात सौरऊर्जा निर्मितीत गुजरात अग्रेसर - ८ ऑगस्ट २०१८

* औद्योगिकीकरणाच्या वाढत्या वेगाबरोबरच देशातील ऊर्जेची मागणीही वाढत चालली आहे. या वाढत्या गरजेची पूर्तता करण्यासाठी सरकार सौरऊर्जेच्या वापरावर भर देताना दिसून येते.

* देशभरातील अपेक्षित सौरऊर्जेच्या निर्मितीमध्ये गुजरातने आधीच मोठी आघाडी घेतली असून, राज्यातील तीन सौरऊर्जा प्रकल्पांची क्षमता ही तब्बल ६ हजार २०० मेगावॅट एवढी आहे.

* देशातील २२ राज्यातील ४५ सौरऊर्जा प्रकल्पांची ऊर्जानिर्मितीची क्षमता ही २६ हजार ४४९ मेगावॅट एवढी असून, अपेक्षित ऊर्जानिर्मितीमध्ये सध्या राष्ट्रीय पातळीवर गुजरात हेच राज्य आघाडीवर असल्याचे दिसते.

* गुजरातपाठोपाठ राजस्थानमध्येही ६ सौरऊर्जा प्रकल्प असून त्यानंतर आंध्रप्रदेशचा क्रमांक लागतो. आंध्रात चार ऊर्जा प्रकल्प असून त्यांची क्षमता चार हजार १६० मेगावॅट एवढ्या ऊर्जानिर्मितीची आहे.

* गुजरातला तीन सौर ऊर्जा प्रकल्पातून ६ हजार २०० मेगावॅट एवढ्या ऊर्जानिर्मितीची परवानगी केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडून मिळाली आहे.

* यामध्ये देशातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प असणाऱ्या अहमदाबादजवळील ढोलेरा येथील प्रकल्पाचा समावेश असून, या प्रकल्पातून ५ हजार मेगावॅट एवढी एनर्जी निर्मिती होऊ शकते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.