सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

डॉ पुनावाला यांचे नोबेलसाठी नामांकन - ६ ऑगस्ट २०१८

डॉ पुनावाला यांचे नोबेलसाठी नामांकन - ६ ऑगस्ट २०१८

* जगातील प्रत्येक दुसरे बालक ज्यांच्या कंपनीत उत्पादित केलेली लस घेते, अशा सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ सायरस पुनावाला यांचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. हा पुरस्कार मिळाल्यास ते देशातील पाचवे नोबेल पुरस्कारार्थी असतील.

* बोस्टन अमेरिका येथील मॅसॅच्यूसेट्स मेडिकल स्कुलतर्फे डॉ पुनावाला यांना डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. त्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

* सिरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक आदर पुनावाला यांनी सकाळशी बोलताना सांगितले आहेत की डॉ सायरस पुनावाला यांचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे.

* डॉ सायरस पुनावाला म्हणाले आम्ही पिता पुत्राने वेगवेगळी औषधें, लसी, रुग्णालये विकसित केली. तसेच पुणे शहर स्वच्छ करण्याचे आव्हानही घेतले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.