शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

राष्ट्रसंत जैन मुनी तरुण सागर यांचे निधन - १ सप्टेंबर २०१८

राष्ट्रसंत जैन मुनी तरुण सागर यांचे निधन - १ सप्टेंबर २०१८

* राष्ट्रसंत जैन मुनी तरुण सागर महाराज यांचे दिल्लीमध्ये निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते. गेल्या २० दिवसापासून ते काविळाने त्रस्त होते.

* ते संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न पाण्याचा त्याग करणे. अतिशय कडव्या विचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी होती.

* त्यांनी अनेक कुप्रथांवर परखड शब्दामध्ये प्रहार करणारे मुनी अशी तरुण सागर यांची ओळख होती. मुनी तरुण सागर यांचं नाव पवन कुमार जैन आहे. त्यांचा जन्म २६ जून १९६७ रोजी मध्य प्रदेशातील दमोह इथल्या गृहजी गावात झाला.

* त्यांच्या आईचे नाव शांताबाई आणि वडिलांचे नाव प्रताप चंद्र आहे. मुनिश्री तरुण सागर यांनी ८ मार्च १९८१ रोजी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी छत्तीसगढ मध्ये दीक्षा घेतली.

* तरुण सागर यांनी मध्य प्रदेशातील आणि हरियाना विधानसभेतही प्रवचनावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मध्य प्रदेश सरकारने ६ फेब्रुवारी २००२ रोजी त्यांनी राजकीय अतिथीचा दर्जाही दिला होता.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.