मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

इंद्रा नुयी होणार पदावरून पायउतार - ७ ऑगस्ट २०१८

इंद्रा नुयी होणार पदावरून पायउतार - ७ ऑगस्ट २०१८

* पेप्सिको या अमेरिकन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मूळ भारतीय वंशाच्या इंद्रा नुयी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. 

* नुयी यांच्यानंतर कंपनीचे अध्यक्ष रामोन लॉगवर्ट सीईओपदाचा कार्यभार संभाळणार असून त्यांची संचालक मंडळावर निवड केल्याची माहिती आज कंपनीने आज दिली.

* इंद्रा नुयी यांनी गेली १२ वर्षे सीईओपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. भारतात लहानाची मोठी होत असताना भविष्यात कधी इतक्या मोठ्या कंपनीने नेतृत्व करण्याची संधी मिळेल.

* अशी कल्पनाही मी केली नव्हती अशी प्रतिक्रिया इंद्रा नुयी यांनी दिली. त्यांनी हा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.