रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

आशियाई स्पर्धेत भारताच्या अश्वारोहणामध्ये ३६ वर्षानंतर रौप्य पदक - २७ ऑगस्ट २०१८

आशियाई स्पर्धेत भारताच्या अश्वारोहणामध्ये ३६ वर्षानंतर रौप्य पदक - २७ ऑगस्ट २०१८

* फवाद मिर्झाने रविवारी रौप्य पदकाचा मान मिळवत आशियाई गेम्समध्ये अश्वारोहन स्पर्धेत गेल्या ३६ वर्षानंतर भारताचा पहिला वैयक्तिक पदक विजेता होण्याचा पराक्रम केला.

* भारताने यापूर्वी आशियाई गेम्समध्ये अश्वारोहणामध्ये तीन सुवर्णपदकासह १० पदके पटकावली आहेत. पण या स्पर्धेत भारतातर्फे मिर्झापूर्वी अखेरचे वैयक्तिक पदक १९८२ मध्ये दिल्ली आशियाई गेम्समध्ये मिळवले होते.

* हिमा दास व मोहम्मद अनस यांनी रविवारी अनुक्रमे महिला व पुरुष ४०० मीटर स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. आशियाई गेम्स ऍथलेटिक्समध्ये भारतासाठी आजचा दिवस चांगला ठरला.

* भारताच्या पुरुष व मिश्र संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश झालेल्या ब्रिज क्रीडा प्रकारात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

* भारताची स्टार धावपटू दूती चंदने रविवारी १८ व्या आशियाई गेम्समध्ये महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत रौप्यपदक पटकावत स्पर्धेत २० वर्षात भारताला प्रथमच पदक मिळवून दिले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.