रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

थोर मुत्सद्दी कोफी अन्नान यांचे निधन - १९ ऑगस्ट २०१८

थोर मुत्सद्दी कोफी अन्नान यांचे निधन - १९ ऑगस्ट २०१८

* संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस आणि शांततेसाठीचा नोबेल पारितोषिक विजेते कोफी अन्नान यांचे शनिवार पहाटे बर्नमधील एका इस्पितळात निधन झाले. ते ८० वर्षाचे होते.

* थोर जागतिक मुत्सद्दी म्हणून ख्याती असलेल्या अन्नान यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या अन्नान फाउंडेशनने ट्विटरवर संदेशाद्वारे दिले. पत्नी नेन व त्यांची तिन्ही अपत्ये अंतिम क्षणी त्यांच्या सोबत होती.

* मूळचे घाना देशाचे नागरिक असलेल्या अन्नान यांनी आपले संपूर्ण आयुष्य संयुक्त राष्ट्रसंघासाठी काम केले. अगदी खालच्या पदापासून वर जात ते या जागतिक संस्थेने पहिले आफ्रिकी वंशाचे कृष्णवर्षी प्रमुख झाले.

* जानेवारी १९९७ ते डिसेंबर २००६ या आठ वर्षात ते सलग दोन वेळा राष्ट्रसंघाचे सरचिटणीस होते. तो काळ अनेक आंतरराष्ट्रीय तंटे व युद्धामुळे खडतर असा होता.

* अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून हे तंटे सोडविण्यात मोलाची भूमिका बजावली. जागतीक शांतता व सद्भावनासाठी केलेल्या कामाचा गौरव २००१ साली नोबेल शांतता पुरस्काराने करण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.