शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

कोल्हापूर-वैभववाडी, मनमाड-धुळे-इंदोर रेल्वेमार्गाला केंद्राची मंजुरी - ३ ऑगस्ट २०१८

कोल्हापूर-वैभववाडी, मनमाड-धुळे-इंदोर रेल्वेमार्गाला केंद्राची मंजुरी - ३ ऑगस्ट २०१८

* कोकण रेल्वेच्या १०३ किलोमीटर लांबीच्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असून लवकरच याचे काम सुरु होणार आहे.

* तसेच मनमाड-धुळे-इंदोर या ३६२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. या नव्या मार्गामुळे धुळ्यासह, नाशिक, जळगाव इंदोरशी जोडले जाणार आहे.

* मनमाड-धुळे-इंदोर या रेल्वे मार्गावर एकूण ४० स्थानके असून दोन बोगदे मंजूर झाले आहेत.

* तसेच कोकण रेल्वेच्या १०३ किलोमीटर लांबीच्या कोल्हापूर-वैभववाडी या मार्गामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल.

* पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण महाराष्ट्राचा किनाऱ्यावरील क्षेत्राशी संपर्क वाढेल. यामुळे या क्षेत्रातील बंदराचा जलदगतीने विकास होईल.

* कोल्हापूर-वैभवाडी या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी ५०% खर्च रेल्वे मंत्रालय तर ५०% खर्च राज्य शासन करणार आहे.

* रत्नागिरी जिल्ह्यात वैभववाडी जवळ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, आणि हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेडचे यांच्या मार्फत तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी ४० अब्ज डॉलरचा निधी अपेक्षित आहे.

* या प्रकल्पातून दरवर्षी ६० लाख टन तेल शुद्धीकरण होईल. यामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही रेल्वे महामार्गामुळे महाराष्ट्राचा विकास होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.