बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

राज्यातील ४ बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा - २२ ऑगस्ट २०१८

राज्यातील ४ बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा - २२ ऑगस्ट २०१८

* मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यासह मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, या बाजार समितींना राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

* आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची नियुक्ती केली जाईल. केंद्र सरकारने तयार केलेल्या मॉडेल ऍक्ट आणि ईटेंडरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

[ राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्यामुळे होणारे बदल ]

* बाजार शुल्काची एकदाच आकारणी [वन टाइम सेस]
* शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार
* पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा यापूर्वीच इनाम योजनेत समावेश झालेला आहे. त्यामुळे ईट्रेंडिंग आणि ऑनलाईन लिलाव सुरु होणार.
* निर्णय प्रक्रिया आणि त्याच्या अंमलबजावणीस होणारा विलंब टाळणे शक्य होणार असून यामुळे विकासकामे वेळेत मार्गी लागतील.
* ऑनलाईन व्यवहारामुळे पारदर्शकता.

* परराज्यातील शेतमालाच्या आवकेचे प्रमाण ३० टक्के पेक्षा अधिक आहे. अशा बाजार समितीचा राष्ट्रिय कृषि बाजाराचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता

* पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीत परराज्यातून मोठ्या प्रमाणावर अवाक होत असल्याने या समितीला राष्ट्रिय बाजाराचा दर्जा मिळणार होता.

* त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. गेल्या तीन वर्षांपासून बाजार समितीवर राज्य सरकारं नियुक्त प्रशासकीय मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली गेली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.