गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन - २३ ऑगस्ट २०१८

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन - २३ ऑगस्ट २०१८

* काँग्रेसमधील अभ्यासू नेते गुरुदास कामत यांचे २२ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते.

* कामत यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील अंकोला येथे झाला. त्यांनी मुंबईच्या आर. ए पोदार महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली.

* त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले असून ते सोनिया गांधी आणि राहुल यांचे निकातवर्णीय म्हणून ओळखले जात.

* २००३-२००८ या काळात ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. २०१३ मध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या समितीच्या महासचिव पदावर त्यांची नियुक्ती झाली. 

* कामत यांनी १९७२ मध्ये विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. १९७६ मध्ये त्यांनी एनएसयुआय काँग्रेसची विद्यार्थी शाखा अध्यक्षपद भूषविले.

* मुंबईच्या पश्चिम उपनगरात गुरुदास त्यांचे वर्चस्व होते. ईशान्य मुंबईत मतदारसंघातून १९८४ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडणूक आले.

* ते सलग १९९१, १९९८, २००४, २००९ मध्ये २०१४ मध्ये ते निवडणूक आले. २०१७ मध्ये मुंबई काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.