शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

भारतातून तांदुळाची विक्रमी निर्यात - २ ऑगस्ट २०१८

भारतातून तांदुळाची विक्रमी निर्यात - २ ऑगस्ट २०१८

* गेल्या आर्थिक वर्षात भारतातून तांदुळाची विक्रमी निर्यात झाली आहे. २०१६-१७ ला १०७ लाख टन त्यातुलनेत २०१७-१८ या वर्षात १२७ लाख टन तांदुळाची निर्यात झाली आहे.

* बांगलादेशने आयातीवर २८ टक्के शुल्क लागू केल्याने तेथील निर्यातीवर परिणाम होण्याचा अंदाज आहे. या वर्षी ५० हजार कोटी रुपये इतके परकी चलन निर्यातीतून मिळाले आहेत.

* निर्यातीमध्ये बिगर बासमती तांदळाचा वाटा अधिक आहे. त्याची २०१६-१७ या वर्षी ६७ लाख टन आणि २०१७-१८ साली ८७ लाख टन इतकी निर्यात झाली होती.

* नुकतेच केंद्र सरकारने तांदळाच्या आधारभूत किमतीत १५० ते २०० रुपये इतकी वाढ असून त्यामुळे निर्यात होणाऱ्या तांदळाचा आयात शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे तेथील निर्यातीवर परिणाम होण्याचा अंदाज व्यापारी राजेश यांनी व्यक्त केला आहे.

* थायलंड, व्हिएतनाम हे जगात तांदळाची सर्वाधिक निर्यात करणारे देश आहेत. या देशांच्या तुलनेत भारतातील बिगर बासमती तांदळाचे भाव कमी असल्याने नेपाळ आणि बांगलादेशातून या तांदळाला मागणी असते.

* अमेरिका आणि युरोपियन देशातूनही बिगर बासमती तांदळाला चांगली मागणी असते. आधारभूत किमतीत वाढीचे परिणाम आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव यावर तांदळाची निर्यात अवलंबून असेल. असे त्यांनी नमूद केले.

* बासमती तांदळाची निर्यात प्रामुख्याने आखाती देशात केली जाते. इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांपैकी इराणने यावर्षी बासमती तांदळाची आयात वाढवली आहे. युरोपियन देश आणि अमेरिकेतून बासमती तांदळाची मागणी तुलनेत कमी होत आहे.

* २०१७-१८ मध्ये तांदूळ निर्यातीतून मिळालेले परकी चलन २६ हजार कोटी व बिगर बासमती तांदुळापासून २४ हजार कोटी रुपये मिळवले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.