सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

जगातिक कसोटी क्रमवारीत विराट कोहली प्रथम - ६ ऑगस्ट २०१८

जगातिक कसोटी क्रमवारीत विराट कोहली प्रथम - ६ ऑगस्ट २०१८

* इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना चौथ्यात दिवशी गमावला असला तरी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी समाधान देणारी घटना घडली. कसोटी क्रमवारीत तो प्रथमच अव्वल असून २०११ मध्ये सचिन तेंडुलकर नंतर अव्वल स्थानी येणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

* कोहलीच्या अगोदर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग, आणि दिलीप वेंगसकर या भारतीयांनी कसोटी क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवलेला आहे.

* कसोटी फलंदाजांची क्रमवारी - विराट कोहली ९३४, स्टीव्ह स्मिथ ९२९, जो रूट ८६५, केन विल्यम्सन ८४७,  डेव्हिड वॉर्नर ८२०, चेतेश्वर पुजारा ७९१, करुणरत्ने ७५४,  दिनेश चंडिमल ७३३, डीन एल्गर ७२४, एडियन मार्करम ७०३.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.