शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

अँपल कंपनीने गाठला १ ट्रिलियन डॉलरचा टप्पा - ३ ऑगस्ट २०१८

अँपल कंपनीने गाठला १ ट्रिलियन डॉलरचा टप्पा - ३ ऑगस्ट २०१८

* अमेरिकेची स्मार्टफोन, संगणक विक्रीत आघाडीवर असलेल्या अँपल ने आज १ ट्रिलियन डॉलर बाजार भांडवल म्हणजेच १ लाख कोटी रुपयाचं भांडवल असलेली अमेरिकेतील पहिली कंपनी बनली आहे.

* या एकट्या कंपनीच भांडवली मूल्य हे जगभरातील १७७ देशांच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे. भारतीय रुपयांमध्ये कंपनीची भांडवली बाजारातील मूल्य ६८,६२० अब्ज रुपये इतकी आहे.

* यावरून स्पष्ट होते की अँपल कंपनीची शेअर बाजारातील पत भारतीय अर्थव्यवस्थेच्या ३८ टक्के हिश्शयाएवढी आहे.

* अँपल कंपनी सध्या इतकी ताकदवान बनली आहे की ती ३ तीन अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानसारख्या देशापेक्षाही जास्त किंमत तिच्या एकत्रित शेअर्सच्या मूल्याची आहे.

* त्याचबरोबर भारतातील दोन सर्वाधिक उत्पन्न असलेल्या कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस या कंपन्यापेक्षा अँपल ही १० पट मोठी कंपनी ठरली आहे. '

* वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार जगातील १९३ देशांपैकी केवळ १६ देशच असे आहेत की ज्यांचा जीडीपी हा अँपलच्या बाजारमूल्यापेक्षा जास्त आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.