बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

इंदोर-मनमाड रेल्वे मार्गासाठी सामंजस्य कराराला मंजुरी - २९ ऑगस्ट २०१८

इंदोर-मनमाड रेल्वे मार्गासाठी सामंजस्य कराराला मंजुरी - २९ ऑगस्ट २०१८

* नवी दिल्ली येथील परिवहन भवन येथे नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पियुष गोयल, संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासन यांच्या दरम्यान ३६२ किमीच्या नवीन इंदोर-मनमाड रेल्वे मार्गाच्या अंमलबजावणी संदर्भात करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

* या नवीन रेल्वे मार्गामुळे मनमाड व इंदोर या औद्योगिक केंद्राचा विकास होईल. तसेच मुंबई दिल्ली औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाला याचा फायदा होणार आहे. धुळे नरडाणा क्षेत्र, नाशिक घोटी सिन्नर क्षेत्र, पुणे खेड क्षेत्र या सर्व क्षेत्राला याचा फायदा होणार आहे.

* या रेल्वे मार्गामुळे दिल्ली-चेन्नई, व दिल्ली बेंगळुरू हे अंतर ३२५ किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच मुंबई ते इंदोर अंतर कमी होईल. व मुंबई ते भोपाळ हे अंतर सुद्धा कमी होईल. यामुळे प्रवाशांचा वेळ व इंधनाचा खर्च वाचणार आहे.

* हा प्रकल्प २०१६ सालीच मंजूर झाला असून मार्गाची लांबी ३६२ किमीचा आहे. तर महाराष्ट्रात याची लांबी १८६ किमी आहे. या मार्गासाठी २००८ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. तसेच ८ हजार ५७४ कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.