शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

शिवसेना देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष - ११ ऑगस्ट २०१८

शिवसेना देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष - ११ ऑगस्ट २०१८

* शिवसेना हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या एडीआर आकडेवारीनुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षात शिवसेनेला तब्बल २५.६५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.

* देशभरातील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीच्या आधारावर एडीआरने हा अहवाल तयार केला आहे.

* शिवसेना दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला ३ हजार ८६५ देणगीदाराकडून २४.७५ कोटी रूपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.

* सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्षाच्या यादीत पंजाबमधील शिरोमणी अकाली दल तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पक्षाला २०१६-१७ या आर्थिक वर्षात १५.४५ कोटी रुपयाची रक्कम देणगी स्वरूपात मिळाली आहे.

* दरम्यान २०१५-१६ ते २०१६-१७ या कालावधीत आसाम गण परिषद आणि जनता दल या दोन पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.