शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मूल्यवान कंपनी - ३ ऑगस्ट २०१८

रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मूल्यवान कंपनी - ३ ऑगस्ट २०१८

* रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बाजार मूल्याच्या हिशेबाने ही कंपनी देशातील सर्वात मूल्यवान कंपनी झाली आहे. त्यांनी टाटा समूहाच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला टीसीएसला मागे टाकले आहे.

* भारतातील सर्वात मूल्यवान कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य ७५१४१४.८९ कोटी रुपये झाले. टीसीएसचे बाजारमूल्य ७४३२२२.१६ कोटी, एचडीएफसी बँक बाजारमूल्य ५७५१८५.४४ कोटी रुपये, आयटीसी बाजारमूल्य ३६३१४९.६३ कोटी रुपये होते.

* मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने फॉर्च्यूनच्या पहिल्या ५०० कंपन्यांच्या यादीत वेळी वरच्या क्रमांकावर उडी मारली आहे. त्यांनी गेल्या वेळी असलेल्या २०३ या क्रमांकावरून या वेळी १४८ वा क्रमांक पटकावला आहे.

* भारतातील सात कंपन्यांनी या वेळी फॉर्च्यूनच्या यादीत स्थान मिळवले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड भारतातील सर्वात वरच्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.

* यांच्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीचे स्थान असून अन्य भारतीय कंपन्यांमध्ये ओएनजीसी, एसबीआय, टाटा मोटर्स, बीपीसीएल, राजेश एक्स्पोर्ट्स यांचा समावेश आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.