बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

देशातील बालकामगाराचे प्रमाण वाढले - ९ ऑगस्ट २०१८

देशातील बालकामगाराचे प्रमाण वाढले - ९ ऑगस्ट २०१८

* देशात मुलीच्या विवाहाचे वय कायद्यानुसार १८ असले तरीही पंधरा वर्षाखालील मुलीच्या विवाहाची संख्या ४५ लाख आहे. आणि यापैकी ७० टक्के मुलींना दोन अपत्ये असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार समोर आली आहे.

* देशातील एकूण मुलांच्या संख्येपैकी ३६% मुलांचे वजन कमी असल्याचे आढळून आले आहे. अहवालातील माहितीनुसार देशातील बालकामगारांचे प्रमाण वाढले आहे.

* मातोश्री नॅशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका मनीषा काशीद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. लहान मुलांचे प्रमाण देशातील एकूण लोकसंख्येच्या ३९ टक्के आहे.

* पाच वर्षापर्यंतच्या मुलांची संख्या २९ टक्के आहे. ५ ते १४ वयोगातील मुलांपैकी अनेक मुले बालकामगार असल्याचे अहवालात म्हटल्याचे काशीद यांनी सांगितले आहे.

* लैंगिक अत्याचाराने पीडित असलेल्या सतरा हजार मुलांची प्रकरणे प्रलंबित आहेत. उत्तर प्रदेशमध्ये १६ हजार, मध्य प्रदेशमध्ये ११ हजार, केरळ, ओडिशा, कर्नाटक, राजस्थान, बंगाल, गुजरात या राज्यात साडेतीन ते पाच हजार प्रकरणे प्रलंबित आहेत.

* चाळीस टक्के मुले वेगवेगळ्या शोषणाला बळी पडत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शारीरिक बाल शोषण, लैंगिक शोषण, मानसिक बाल शोषण, निष्काळजी पणामुळे होणारे बाल शिक्षण, बालकामगार स्पर्धेचे ओझे शोषणाचे प्रकार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.