बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

आंतराष्ट्रीय कामगार संघटनेचा महिलांच्या वेतनविषयक अहवाल - २९ ऑगस्ट २०१८

आंतराष्ट्रीय कामगार संघटनेचा महिलांच्या वेतनविषयक अहवाल - २९ ऑगस्ट २०१८

* भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत मिळणारे वेतन झपाट्याने वाढत आहे. स्त्री-पुरुषांच्या वेतनातील तफावत आता बरीच कमी झाली असली तरी एकाच कामासाठी महिलांना अजूनही खूपच कमी वेतन दिले जाते.

* आंतराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आयएलओ च्या अहवालात ही माहिती देण्यात आली. अहवालात म्हटले आहे की १९९३-९४ ते २०११-१२ या काळात भारतातील महिलांच्या वेतनात झपाट्याने वाढ झाली आहे.

* असंघटित क्षेत्रातील वेतनात संघटित क्षेत्रातील वेतनापेक्षा जास्त वाढ झाली आहे. संघटित क्षेत्रात रोजगार वाढला असला तरीही तरी बहुतांश रोजगार कायमस्वरूपी नाहीत.

* अहवालात म्हटले आहेत की नियमित वेतनधारी कर्मचाऱ्यात महिलांच्या सहभागाचा वार्षिक दर १९९३-९४ मध्ये २.९ टक्के होता. २०११-१२ मध्ये तो जवळपास दुपटीने वाढून ४.७% झाला.

* राज्य उद्योग आणि व्यवसाय अशा सर्व पातळीवर वेतनातील स्त्री-पुरुष भेद कमी झाला आहे. वेतन विस्ताराची गुणवत्ताही वाढली आहे. आंतरराष्ट्रीय मानकांच्या तुलनेत मात्र ही तफावत अजूनही खूप अधिक आहे.

* अहवालात भारतातील ग्रामीण भागातील महिलांचे किमान वेतन प्रतिदिन अवघे १०४ रुपये एवढे आहे. अल्प कौशल्य व्यवसायात महिलांचे प्रमाण अधिक आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.