शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

सांगली व जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाला बहुमत - ४ ऑगस्ट २०१८

सांगली व जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाला बहुमत - ४ ऑगस्ट २०१८

* तब्बल ४० वर्षांनी जळगाव महापालिकेत भाजपने मुसंडी मारत काँग्रेसच्या सुरेश दादा जैन यांना धोबीपछाड केले. तसेच एकूण ७५ जागेपैकी भाजपाला ५७ जागा मिळाल्या, तर शिवसेनेला १५ जागा, एमआयएमला ३ जागा मिळाल्या.

* माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी असलेल्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीला फक्त एकूण ७८ जागेपैकी ३५ जागा तर भाजपला ४१ जागा मिळवून महापालिकेत सत्ता काबीज केली.

* या निवडणुकीतून असे सिद्ध होते की अजूनही भाजपाची म्हणजेच नरेंद्र मोदी यांची लाट शहरी भागात तसेच ग्रामीण भागातही पसरलेली आहे. कारण सांगली हा राष्ट्रवादी व काँग्रेस यांचा बालेकिल्ला असून तिथे भाजपने बहुमताने सरकार आणले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.