शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

आयडिया-वोडाफोन कंपनी विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण - १ सप्टेंबर २०१८

आयडिया-वोडाफोन कंपनी विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण - १ सप्टेंबर २०१८

* आयडिया सेल्युलर आणि वोडाफोन इंडिया या कंपन्यांची विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विलीनीकरनंतर तयार झालेली नवी कंपनी भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे.

* दोन्ही कंपन्यांनी एका संयुक्त निवेदनात जारी करून विलीनीकरणाची माहिती दिली. वोडाफोन आयडिया ली असे या नव्या कंपनीचे नाव असून कंपनीचे ४०८ दशलक्ष ग्राहक आहेत.

* नव्या कंपनीसाठी १२ सदस्यांचे संचालक मंडळ स्थापन केले आहे. त्यात स्वतंत्र संचालक आहेत. कुमार मंगलम बिर्ला हे नव्या कंपनीचे चेअरमन आहेत.

* संचालक मंडळाने लगेचच कारभार सुरु केला असून बालेश शर्मा यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की दोन्ही कंपन्या एकत्र करण्यात आल्या असल्या तरीही वोडाफोन आणि आयडिया हे ब्रँड कायम राहतील.

* दोघांचा मिळून ३२.२ टक्के बाजार हिस्सा कंपनीकडे असेल. देशातील नऊ दूरसंचार मंडळात कंपनी सर्वोच्च स्थानी राहील. सध्या भारतीय एअरटेल ही कंपनी पहिल्या स्थानी होती. तिच्या स्थानाला आता धक्का लागणार आहे.

* रिलायन्स जियोने दूरसंचार क्षेत्रात आगमन झाल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले होते.

* नव्या कंपनीचे ३.४ लाख स्थानावर ब्रॉडबँड नेटवर्क असेल. तसेच देशात १७ किरकोळ विक्रीची केंद्रे असतील. विलीनीकरणामुळे कंपनीला दरवर्षी १४ हजार कोटी रुपयांचा लाभ होईल.  कंपनीच्या महसुली खर्चात ८,४०० कोटीची बचत होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.