रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

भारताच्या नेतृत्वाखाली टेलिस्कोप मॅनेजर प्रकल्प विकसित - ५ ऑगस्ट २०१८

भारताच्या नेतृत्वाखाली टेलिस्कोप मॅनेजर प्रकल्प विकसित - ५ ऑगस्ट २०१८

* अवकाशातील घडामोडी, ग्रह ताऱ्यांची उत्तमोत्तम निरीक्षणे, गुरुत्वीय लहरी, अशा विश्वातील अनेक रहस्य उलगडण्यास उपयुक्त ठरणारी एसकेए ही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण उभारण्यात येत आहे.

* यातील टेलिस्कोप मॅनेजर ही दुर्बीण संचार आणि नियंत्रण प्रणाली भारताच्या नेतृत्वाखाली विकसित झाली आहे. या राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र [एनसीए] महत्वाची भूमिका बजावत आहे.

* त्यातील माणसाच्या शरीरातील मेंदूचे आणि मज्जासंस्थेचे काम चालते. त्याप्रमाणे रेडिओ दुर्बिणीत टेलिस्कोप मॅनेजरचे काम असणार आहे.

[एसकेए प्रकल्पाविषयी]

* विविध देशांनी मिळून जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण उभारण्याचा स्केअर किलोमीटर ऍरे एसकेए हा प्रकल्प आहे.

* याद्वारे विश्वातील रहस्य, माहिती सखोलपणे होण्यास आणि खगोल भौतिकशात्रातील मूलभूत सिद्धांत समजण्यास मदत होईल. ही रेडिओ दुर्बीण सध्याचा इतर रेडिओ दुर्बिणींपेक्षा दोनशे पटीने अधिक सक्षम असेल.

* ही रेडिओ दुर्बीण सध्याच्या रेडिओ इतर दुर्बिणींपेक्षा दोनशे पटीने अधिक सक्षम असेल. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया येथे दुर्बीण उभारली जाणार असून, नंतरच्या कालावधीत इतर आफ्रिकन देशामध्ये ती पसरली जाणार आहे.

* या प्रकल्पातून भारतासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, फ्रान्स, इटली, नेदरलँड, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, आणि इंग्लंड या देशांचा समावेश आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.