मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

देशात मोबाईल ग्राहकांची संख्या ११६ कोटीच्या वर - २१ ऑगस्ट २०१८

देशात मोबाईल ग्राहकांची संख्या ११६ कोटीच्या वर - २१ ऑगस्ट २०१८ 

* देशातील दूरसंचार सेवा उपलब्द करणाऱ्या ग्राहकांची एकूण संख्या जून महिन्यात ११६.८ कोटीच्या घरात पोहोचली आहे. या महिन्यात रिलायन्स जिओ कंपनीने सर्वाधिक ग्राहक जोडले आहेत. 

* दूरसंचार नियामक ट्राय संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार मे महिन्यात देशातील दूरसंचार ग्राहकांची संख्या ११५.३५ कोटी होती. 

* या महिन्यात जियोने ९७ लाख, आयडिया ६३ लाख, वोडाफोन २.७६ लाख नवे ग्राहक मिळविले आहेत. बीएसएनएल २.४४ लाख, एअरटेल १०६८९ नवे ग्राहक मिळवले आहेत. 

* तसेच ट्रायच्या आकडेवारीनुसार देशात लँडलाईन जोडण्याचे प्रमाण कमी होणे सुरूच आहे. जूनमहिन्यात लँडलाईन धारकांची संख्या कमी होऊन २.२४ कोटी झाली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.