शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

भारत व आशियावर बेरोजगारीचे संकट - २ ऑगस्ट २०१८

भारत व आशियावर बेरोजगारीचे संकट - २ ऑगस्ट २०१८

* आशियातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख निर्माण होत असली तरी वाढत्या बेरोजगारीने देशासमोर नवे संकट उभे केले आहे.

* भारतातील तब्बल ७७ टक्के रोजगार अस्थिर असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अहवालात देण्यात आला आहे.  चालू वर्षात भारतातील बेरोजगारीचा दर ३.५ एवढा कमी असणार आहे.

[ अहवालातील प्रमुख मुद्दे ]

* भारतातील बेरोजगारीचे दर या वर्षी ३.५ टक्के
* चीनचा बेरोजगारीचे दर वाढून ४.८ टक्क्यावर जाणार
* भारतातील ७७ टक्के तर चीनमधील ३३ टक्के रोजगार असुरक्षित
* भारत, बांगलादेश, कंबोडिया, नेपाळमध्ये असंघटित क्षेत्रात ९० टक्के कामगार
* आशिया-प्रशांत क्षेत्रातील अर्थव्यवस्था सरासरी ५.५ टक्क्यांनी वाढणार
* भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ७.४ टक्के राहील त्यामुळे दक्षिण आशियामध्ये आर्थिक आघाडी समाधानकारक असेल.
* इन्फर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये भारतात रोजगारवाढ
* भारतातील सेवाक्षेत्र वाढले, पण दर्जा खालावला
* जगभरात १.४ अब्ज अस्थिर नोकऱ्या, त्यापैकी ३९.४ कोटी रोजगार भारतात
* भारतातील अपारंपरिक ऊर्जेचा वापर ४० टक्क्यावर गेल्यास ३० लाख नव्या नोकऱ्या
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.