मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

सरकारचे ईकॉमर्स व्यवसायिक ड्रोन विषयक धोरण जाहीर - २८ ऑगस्ट २०१८

सरकारचे ईकॉमर्स व्यवसायिक ड्रोन विषयक धोरण जाहीर - २८ ऑगस्ट २०१८

* ईकॉमर्स साईटवर एखाद्या वस्तूची किंवा खाद्य पदार्थाची ऑर्डर दिल्यानंतर उद्या ड्रोनद्वारे घरपोच डिलिव्हरी मिळाल्यास आश्यर्य वाटून घेऊ नका. कारण सोमवारीच केंद्रीय नागरी हवाई उड्डयन मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भात धोरण जाहीर केले आहे.

* ड्रोनचा व्यवसायिक वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या वस्तूची डिलिव्हरी ड्रोनद्वारे होऊ शकते.

* येत्या १ डिसेम्बरपासून देशभरात ड्रोनच्या उड्डाणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. पण त्याचसोबत काही अटी सुद्धा घालण्यात आल्या.

* ड्रोनचा सुरळीत वापर सुरु राहिल्यास त्या अटीमधून दिलासाही मिळू शकतो असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. वजनानुसार ड्रोनची पाच विभागामध्ये विभागणी करण्यात आली आहे.

* सर्वात छोटे नॅनो ड्रोन ज्याचे वजन २५० ग्रॅम असेल. सर्वात वजनदार १५० किलोचे ड्रोन मोडतात. लहान मूल खेळणी म्हणून अशा ड्रोनचा वापर करतात.

* २ किलो पेक्षा जास्त वजनाच्या ड्रोनसाठी परवाना बंधनकारक असेल. उर्वरित तीन विभागामध्ये दोन किलोपेक्षा जास्त वजनाच्या ड्रोनसाठी परवाना बंधनकारक असेल.

* उर्वरित तीन विभागामध्ये दोन किलोपेक्षा जास्त वजनाची ड्रोन ज्यांना उडवायची असतील त्यांना नोंदणी करावी लागेल. त्यांना युआयएन नंबर दिला जाईल.

* ज्यांना कोणाला अशा ड्रोनचे परवाने हवे असतील त्यांची वयोमर्यादा १० पेक्षा जास्त असली पाहिजे तसेच दहावीपर्यंतच्या शिक्षणाबरोबर त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

* रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीमच्या आरपीएस वापरासाठी मानवरहित विमान संचलन परवाना आवश्यक आहे.

* फक्त दिवसा प्रकाशात ४०० फूट उंचीपर्यंत तुम्ही ड्रोन उडवू शकता असे धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, दिल्लीतला विजय चौक, राज्यातील सचिवालय, लष्करी तळ या ठिकाणी ड्रोनला नो फ्लाय झोन असेल. म्हणजे ड्रोन उडवता येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.