मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

तामिळनाडूमधील डीएमकेचे नेते एम करुणानिधी यांचे निधन - ८ जुलै २०१८

तामिळनाडूमधील डीएमकेचे नेते एम करुणानिधी यांचे निधन - ८ जुलै २०१८

* ७५ वर्षे तामिळनाडूच्या जनतेवर मनावर राज्य करणारे द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते व ५ वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले एम करुणानिधी यांचे येथील कावेरी रुग्णालयात मंगळवारी वृद्धापकाळातील आजारामुळे निधन झाले.

* ते ९४ वर्षाचे होते. तामिळनाडू द्रविडी चळवळ रुजविण्यात व हिंदी भाषाविरोधी आंदोलन उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तामिळी जनता त्यांना प्रेमाने कलैगार [कलावंत] नावाने पुकारत असे.

* त्यांच्या निधनाने संपूर्ण तामिळनाडूवर शोककळा पसरली. तामिळनाडू सरकारने बुधवारी सार्वजनिक सुट्टी व सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.

* केंद्र सरकारनेही दुखवटा जाहीर केला आहे. चेन्नईतील त्यांचे निवासस्थान व रुग्णालयापाशी हजारो समर्थकांनी गर्दी केली. निधनाने वृत्त येताच राज्यातील सर्व शहरात उत्स्फूर्त बंद सुरु झाला आहे.

[ एम करुणानिधी यांचा जीवनप्रवास ]

* मुथ्थुवेलू आणि अंजुगम यांच्या पोटी तीन जून १९२४ रोजी करुणानिधीचा तिरुकुवलाई [नागपट्टणम] येथे जन्म झाला. करुणानिधीनी तमिळ चित्रपटातून आपले करिअर सुरु केले.

* सामाजिक सुधारणा आणि ऐतिहासिक लेखनाबद्दल ते अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. प्रागतिक विचाराच्या करुणानिधीने चित्रपटाच्या माध्यमातून आपले विचार सामान्यांपर्यंत पोचवणे सुरु केले.

* वयाच्या १४ व्या वर्षी १९३२ मध्ये [जस्टीस पार्टी] च्या अळगिरीस्वामी यांच्या भाषणाने करुणानिधी प्रभावित झाले. आणि राजकारणात उतरले.

* १९५७ मधील तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत करुणानिधी कुलीथलाई मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले. करुणानिधी १९६१ मध्ये द्रमुकचे खजीनदार आणि १९६२ मध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष उपनेते झाले.

* १९६९ मध्ये नेते अण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर करुणानिधी मुख्यमंत्री धुरा सांभाळत पक्षविस्तार केला. त्याला घट्ट जनाधार मिळवून दिला. त्याच्या बळावरच ते पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री विराजमान झाले.

* परंपरागत विरोधक जे जयललिता यांच्या अण्णा द्रमुकला धूळ चारत २००६ ची निवडणूक करुणानिधी द्रमुक ला जिंकून दिली. १३ मे २००६ रोजी ते पाचव्यांदा तामिळनाडू विधानसभेवर निवडून गेले. एकदा सध्या विसर्जित केलेल्या तामिळनाडू विधान परिषदेवर निवडले गेले होते.

*  वयाच्या २० व्या वर्षी करुणानिधी यांनी ज्युपिटर पिक्चरसाठी पटकथा लेखन केले. त्यांच्या राजाकुमारी चित्रपटाने त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवून दिली.

* करुणानिधींची वाटचाल - १९६१ द्रमुकचे खजिनदार, १९६२ विधानसभेत विरोधी पक्ष उपनेते, १९६७ सार्वजनिक बांधकाम मंत्री, फेब्रुवारी १९६९ -१९७१ पहिल्यांदा मुख्यमंत्री, १९७१-७६ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, १९८९-१९९१ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, १९९६-२००१ चौथ्यांदा मुख्यमंत्री, २००६-२०११ पाचव्यांदा मुख्यमंत्री.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.