शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १० ऑगस्ट २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १० ऑगस्ट २०१८

* भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या इस्रो चंद्रयान-२ मोहिमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आले आहे.

* राष्ट्रीय इतर मागासवर्ग ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे १२३ वे घटनादुरुस्ती विधेयक ३ ऑगस्ट रोजी लोकसभेत मंजूर झाले आहे.

* राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेने एनसीएईआर जारी केलेल्या गुंतवणूक क्षमता निर्देशांकात दिल्लीचे स्थान प्रथम स्थानावर आहे.

* भारताच्या गगनजीत भुल्लरने ऑस्ट्रेलियाच्या अँथोनी क्वाएएल याला पराभूत करत युरोपियन गोल्फ मालिकेतील आपल्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरले.

* अणूतील उपकणांचा शोध लावणारे नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ बर्टन रिश्टर यांचे १८ जुलै रोजी निधन झाले.

* व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो एका वृत्तवाहिनीवर लाईव्ह भाषण करत असताना झालेल्या ड्रोन हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहे.

* प्रा अनिल सहस्त्रबुद्धे यांची अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या एआयसीटीई अध्यक्षपदी त्यांची फेरनिवड करण्यात आली.

* गुवाहाटी झालेल्या आंतरराज्य ऍथलेटिक्स स्पर्धेत स्पीचलेस धावपटू नवीन डागरने उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे.

* केंद्र सरकारकडून कापड उद्योगातील ३२८ वस्तूवरील आयात शुल्क सध्याच्या १० टक्क्यावरून वाढवून २०% करण्यात वाढवण्यात आले आहे.

* अमेरिकन कंपनी बोईंगकडून खरेदी करण्यात आलेल्या पी ८-आय या पाणबुडी विरोधी विमानाच्या खरेदी व्यवहारावर कॅगने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

* एस्कॉर्ट उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन नंदा यांचे ५ ऑगस्ट रोजी निधन झाले.

* सहकार भारती या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत सहकारी अर्थचळवळीचे प्रणेते जनकल्याण आणि युनायटेड वेस्टर्न बँक आदींचे माजी अध्यक्ष सतीश मराठे यांची केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे.

* उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत महाराष्ट्राचे वीरपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शाहिद झाले.

* राज्यात बांबू क्षेत्राचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक एजन्सीचा समावेश करून महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्टान या कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे.

* भारतीय फुटबॉल संघाने कोटिफ कप स्पर्धेत सहावेळा २० वर्षाखालील विश्वचषक उंचावणाऱ्या अर्जेंटिनावर २-१ असा आश्चर्यकारक विजय मिळवला.

* न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदाची ८ ऑगस्ट रोजी शपथ घेतली. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सध्या काम करणाऱ्या महिला न्यायाधीशाची संख्या तीनवर पोहोचली आहे. ही ऐतिहासिक नोंद असून त्यामुळे आर भानुमती, इंदू मल्होत्रा आणि इंदिरा बॅनर्जी या तीन महिला न्यायाधीश पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाचे कामकाज पाहणार आहेत.

* मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून राष्ट्रपतींनी ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. नरेश हरीशचंद्र पाटील यांची ६ ऑगस्ट रोजी नियुक्ती केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.