शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

ज्येष्ठ पत्रकार, लेखक कुलदीप नय्यर यांचे निधन - २४ ऑगस्ट २०१८

ज्येष्ठ पत्रकार, लेखक कुलदीप नय्यर यांचे निधन - २४ ऑगस्ट २०१८

* ज्येष्ठ पत्रकार, लेखक व मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे निधन दिल्ली येथे झाले. ते ९४ वर्षाचे होते. आणीबाणीच्या काळात नय्यर हे तुरुंगातही गेले होते.

* त्यांना प्रतिष्ठेचा रामनाथ गोयंका जीवनगौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले. देशातील विविध वृत्तपत्रासाठी त्यांनी लेखन केले.

* त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोट भागात झाला होता. द इंडियन एक्स्प्रेस चे संपादक भूषविले नय्यर पत्रकारितेच्या आणीबाणी विरोधांत लढाईचे प्रतीक बनले होते.

* त्यांनी इंडियन एक्स्प्रेस डेक्कन हेराल्ड, द डेली स्टार, द संडे गार्डियन, द न्यू, ट्रिब्यून पाकिस्तान, डॉन पाकिस्तान अशा ८० हुन अधिक वृत्तपत्रासाठी १४ भाषांमध्ये त्यांनी स्तंभलेखन केले होते. इंडिया आफ्टर नेहरू, इमर्जन्सी रिटोल्ड अशी १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.