मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

१० मी एअर पिस्तूल प्रकारात सौरभ चौधरीचे सुवर्णपदक - २१ ऑगस्ट २०१८

१० मी एअर पिस्तूल प्रकारात सौरभ चौधरीचे सुवर्णपदक - २१ ऑगस्ट २०१८

* आशियाई खेळामध्ये सलग तिसऱ्या दिवशी नेमबाजांची भारताला पहिलं पदक मिळवून देण्याचं काम केलं. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या सौरभ चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली.

* अंतिम फेरीत सौरभने जपानच्या टी मस्तूदला मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माला कांस्यपदक मिळालं आहे.

* पात्रता फेरीतही सौरभ चौधरीने अव्वल स्थान मिळवलं. सौरभच्या या कामगिरीसाठी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने ५० लाखाचं इनाम घोषित केले आहेत.

* दुसरीकडे ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्य पदकाची कमाई केली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.