सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला - २० ऑगस्ट २०१८

आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला - २० ऑगस्ट २०१८

* इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत दंगल चित्रपटामुळे कुस्तीत जगप्रसिद्ध झालेल्या फोगट गर्लचीच चुलत बहीण विनेश फोगट हिने सोमवारी इतिहास रचला. ती आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय मल्ल ठरली.

* अंतिम फेरीत जपानच्या युकी इरीला ६-२ ने पराभूत करीत तिने सुवर्णपदकावर नाव कोरले. हरियाणातील नामांकित मल्ल महावीरसिंग फोगट यांचा भाऊ राजपा यांची विनेश ही मुलगी आहे.

* यापूर्वी विनेशने २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. आतापर्यंत भारताने आशियाई स्पर्धेत २ सुवर्ण, २ रौप्य, १ कास्य पदक जिंकले आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.