मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

आयुष्यमान भारत योजना २५ सप्टेंबरपासून देशभर - २९ ऑगस्ट २०१८

आयुष्यमान भारत योजना २५ सप्टेंबरपासून देशभर - २९ ऑगस्ट २०१८

* आयुष्यमान भारत योजना २५ सप्टेंबरपासून दिल्ली, केरळ, ओडिशा, पंजाब, व कर्नाटक राज्य वगळता देशभर लागू होईल.

* मोदी केयर या नावाने प्रसिद्ध झालेल्या या आरोग्य विमा योजनेत भरती होण्याच्या तीन दिवस आदी आणि रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर १५ दिवसापर्यंतच्या औषधांचा खर्च समाविष्ट असेल.

* रुग्णालयात पोहोचल्यानंतर अर्ध्या तासात उपचारांची हमीदेखील या योजनेत दिली गेलेली आहे.  कोणत्याही लाभार्थीचा डेटा लीक न होता ९० प्रकारचे सांकेतांक कोड वापरले जातील.

* लोकांना या योजनेशी जोडण्यासाठी इकडे तिकडे भटकायची वेळ येऊ नये यासाठी देशभरात कार्यरत तीन लाखापेक्षा जास्त कॉमन सर्व्हिस सेंटरच्या सीएससी माध्यमातून या योजनेचे कार्ड उपलब्द करण्याबरोबर याच सीएससीवर इच्छुक योग्य लाभार्थी या योजनेत आपले नाव शोधू शकेल अशी सोय करू शकतील.

* अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ जे. पी. नड्डा यांनी सोमवारी ही योजना लोकांसाठी जाहीर करताना दिली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.