बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीत आयएमएफ - ९ ऑगस्ट २०१८

भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीत आयएमएफ - ९ ऑगस्ट २०१८

* भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीत असून पुढील काही दशके जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा स्रोत राहील. असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रानिल सालगॅडो यांनी व्यक्त केला आहे.

* रानिल सालगॅडो हे आयएमएफचे भारतासाठीच्या विभागाचे प्रमुख आहेत. ते म्हणाले की मागील काही दशकात चीनने ज्याप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्थेचे सुकाणू आपल्या हाती धरले होते.

* त्याचप्रमाणे पुढील काही दशके भारत जागतिक अर्थव्यवस्थेचे सुकाणू धरणार आहे. भारतात आता मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा होत आहेत. 

* जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा हिस्सा आता १५ टक्क्यावर गेला असून तो खूप आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला फार गळती लागू शकत नाही. कारण ती एक बंद अर्थव्यवस्था आहे.

* भारताचा व्यापार चीनएवढा मोठा नाही. भारतातील लोकसंख्या तरुण असून ती म्हातारी होण्याची सुरुवात होण्यास अजून तीन दशकांचा काळ आहे. तो काळ विकासासाठी भरपूर आहे.

* तसेच भारतासाठी देखील हीच संधी आहे. आशियातील इतर काही देश देखील या दिशेने प्रवास करू लागले आहेत. ते पुढे येईपर्यंत भारताकडे ३० वर्षांचा काळ आहे.

* २०१८-१९ वर्षी भारत ७.३ टक्के दराने विकास साधणार आहे. तसेच २०१९-२० साली भारताचा विकास ७.५% असेल. २०१६ सालची नोटबंदी आणि जीएसटी कायद्याच्या अनुपालनामुळे निर्माण झालेल्या मंदीतून भारतीय अर्थव्यवस्था आता उभारी घेऊ लागली आहे.

* विकासदर पुन्हा मूळ पदावर येताना आम्हाला दिसत आहे. सरकारची व्यापक धोरणे, स्थैर्य निर्माण करणारे निर्णय, आणि काही महत्वाच्या आर्थिक सुधारणा यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आता लाभ मिळू लागला आहे.

* काही तात्पुरत्या अडचणी फुटकळ आहेत. भारतासारख्या २९ राज्ये असलेल्या देशामध्ये जीएसटी लागू करणे खूप कठीण काम असताना देखील या देशाने ते यशस्वीपणे पार पाडले. असे आयएमएफ यांना वाटते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.