सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

फरार आर्थिक गुन्हेगार विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी - ६ ऑगस्ट २०१८

फरार आर्थिक गुन्हेगार विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी - ६ ऑगस्ट २०१८

* फरार आर्थिक गुन्हेगार विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. आर्थिक गुन्हे करून भारताबाहेर पलायन करण्याच्या व भारतातील न्यायालयाच्या प्रक्रियेतून स्वतःला वाचवण्याच्या या गुन्हेगाराच्या प्रयत्नात आता आळा बसणार आहे.

* १०० कोटी रुपये वा त्यापेक्षा अधिक मूल्याच्या आर्थिक गुन्ह्यामध्ये गुंतलेल्या गुन्हेगारावरील कारवाईसाठी अटक वॉरंट जारी केले आहे. व तो गुन्हेगार गुन्हेगारीविरोधातील साऱ्या प्रक्रियेपासून वाचवण्यासाठी देशाबाहेर पळाला आहे. तर अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी हे घालण्यासाठी हे विधेयक कणखर बनवण्यातच आले आहे.

* एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजुरी दिली. विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी यासारख्या आर्थिक गुन्हेगारीविरोधात सीबीआय चौकशी करीत आहे.

* अशा प्रकारच्या आरोपींची मालमत्ता, बेनामी मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार मिळणार आहे. प्राधिकृत न्यायालयाने त्या गुन्हेगाराला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले की हि कारवाई शक्य होणार आहे. 

* जप्तीच्या आदेशानुसार जी मालमत्ता जप्त केली गेली असेल त्याचे अधिकार हे केंद्र सरकारकडे असणार आहेत. २५ जुलै रोजी हे विधेयक राज्यसभेत तर १९ जुलैला लोकसभेत ते मंजूर झाले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.