शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

जगातल्या सर्वात मोठी आरोग्य विमा योजना लवकरच भारतात - १७ ऑगस्ट २०१८

जगातल्या सर्वात मोठी आरोग्य विमा योजना लवकरच भारतात - १७ ऑगस्ट २०१८

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येला आरोग्य विमा योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे योजनेवर दरवर्षी ११ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असून हा खर्च राज्य व केंद्र सरकार करणार आहे.

* या आरोग्य विमा योजनेबाबत केंद्र व राज्य सरकारांनी मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली असून ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असणार आहे. 

* सुमारे ५० कोटी लोकांना योजनेचा फायदा होणार असून २०१८ मध्ये अर्थमंत्र्यांनी [आयुष्यमान भारत] ही योजना नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीमची योजना असून तिला मोदीकेअर असेही संबोधले जाते.

* यातून सुमारे १० कोटी कुटुंबाना लाभ होणार आहे. सुमारे ४० ते ५० कोटी लोकांना फायदा मिळू शकणार आहे. योजनेद्वारे या सुमारे ५० कोटी लोकांना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल व त्यासाठी केंद्राला प्रतिवर्षी ११ हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

* त्यामुळे सरकारी खजिन्यावर त्याचा भार पडणार आहे. अर्थसंकल्पामध्ये २००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढेही केंद्र सरकार आणखी अर्थसंकल्पीय तरतूद करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

* नीती आयोगाच्या माहितीनुसार या योजनेसाठी ६०% खर्च केंद्र सरकार व ४०% खर्च राज्य सरकार पेलणार आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ओबामा यांनी सुरु केलेल्या ओबामाकेअर सारखी ही आरोग्य विमा योजना असून यामध्ये अनेक पैलूही आहेत.

* त्यामुळे येत्या काही दिवसात केंद्र सरकार त्यातील काही बारकावे व विमा योजना, सहभागी कंपन्या, देशभरातील संलग्न रुग्णालयाचे जाळे विमा हफ्ते याबाबत खुलासा करण्याची शक्यता आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.