गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन - १६ ऑगस्ट २०१८

भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन - १६ ऑगस्ट २०१८

* भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते त्यांच्याच कर्णधारपदाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 

* १९५८ साली मुंबईच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १९६६ ते १९७४ या काळात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारे वाडेकर एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जायचे. 

* अजित वाडेकर यांच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना १९६७ साली अर्जुन आणि १९७२ साली पदमश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. 

* १ एप्रिल १९४१ रोजी मुंबईत वाडेकर यांचा जन्म झाला. त्यांनी शिकून इंजिनिअर व्हावे पण ते क्रिकेटपटू झाले. १३ डिसेंबर १९६६ मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 

* भारताकडून ३७ कसोटी सामने खेळताना त्यांनी ३१.०७ च्या सरासरीने २,११३ धावा केल्या. यात एक शतक आणि १४ अर्धशतक यांचा समावेश आहे. 

* ते भारताचे पहिले वनडे कर्णधार होते. अजित वाडेकर यांची मुंबईच्या कर्णधारपदी निवड झाल्यावर लगेचच १९७१ साली त्यांची भारताच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.