बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

वहामा पाल सिंग यांना मरणोत्तर कीर्तीचक्र - १५ ऑगस्ट २०१८

वहामा पाल सिंग यांना मरणोत्तर कीर्तीचक्र - १५ ऑगस्ट २०१८ 

* देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या जवानांना देण्यात येणाऱ्या शौर्य पुरस्काराची घोषणा स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला आज करण्यात आली.

* राष्ट्रीय रायफल्समधील वहामा पाल सिंग यांना मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्काराने गौरविले जाईल. तर दहशतवाद्यांना कंठस्थान घालणारा जम्मू काश्मीर पोलीस दलाचा शूर शिपाई औरंगजेब यालाही मरणोत्तर शौर्यचक्र सन्मान देण्यात येईल.

* शौर्यचक्र सन्मान देण्यात येईल. शौर्यचक्र विजेत्यांत हुतात्मा मेजर आदित्य कुमार यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय रायफल्समधील नंदकिशोर दीपक खडसे या महाराष्ट्राच्या सुपुत्राला सेना पदक जाहीर झाले आहे. 

* आयएनएस तारिणी या नौकेतून पृथ्वीची समुद्र परिक्रमा करणाऱ्या सहा महिला अधिकाऱ्यांनाही नौसेना सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.

* यंदा १३१ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात एक कीर्तीचक्र, २० शौर्यचक्र तीन विशिष्ट सेना पदके, ११ नौसेना पदके व तीन वायुसेना पदकांचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.