मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

देशात जोधपूर सर्वात स्वच्छ रेल्वे स्टेशन - १४ ऑगस्ट २०१८

देशात जोधपूर सर्वात स्वच्छ रेल्वे स्टेशन - १४ ऑगस्ट २०१८

* रेल्वेच्या सर्वात स्वच्छ स्टेशनच्या यादीत ए १ श्रेणीत महाराष्ट्रातील वांद्रे स्टेशन सात नंबरवर आहे. तर दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे. नागपूर या यादीत ३२ व्या क्रमांकावर आहे.

* पहिल्या ३ क्रमांकावर जोधपूर, जयपूर, आणि तिरुपती रेल्वे स्टेशनचा समावेश नाही. या यादीत पहिल्या दोन स्थानावर राजस्थानचे मारवाड आणि फुलेरा यांचा समावेश आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिणेतील वारंगल रेल्वे स्टेशन आहे.

* ए १ आणि ए श्रेणीत राजस्थानचे सर्वाधिक स्टेशन आहेत. तसेच मुंबई सीएसटीम आणि दादर हे स्टेशन आहेत. या अहवालानुसार १ ए श्रेणीच्या रेल्वे स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील मुंबई सीएसटी १३ व्या क्रमांकावर आहे.

* तर पुणे २५ व्या, नागपूर ३२ व्या, एलटीटी ३५ व्या, मुंबई सेंट्रल ४० व्या, सोलापूर ४८ व्या, ठाणे ५७ व्या, कल्याण ७४, क्रमांकावर आहेत.

* ए श्रेणीच्या रेल्वे स्टेशनमध्ये बडनेरा २६, अकोला २७, नाशिक रोड ४१, वास्को दी गामा ५७, नाडियाड ७५, अमरावती ७८, वर्धा ८३, कोल्हापूर ११७, मनमाड १४३, अहमदनगर १५८, कुर्डुवाडी १६८, जळगाव १८४, लातूर २१२, शिर्डी २२०, चंद्रपूर २२२, पनवेल १४३, लोणावळा २६३, कोपरगाव २८६, क्रमांक प्राप्त झाला.

* हे सर्वेक्षण करताना स्टेशन मास्टर कडूनही माहिती घेण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की ए १ श्रेणीच्या स्टेशनवर ३०० तर ए श्रेणीच्या स्टेशनवर २५० लोकांशी चर्चा करण्यात आली.

* त्यानंतर देशातील सर्वात स्वच्छ ५०० रेल्वे स्टेशनची क्रमवारी जाहीर करण्यात आली. यासाठी स्टेशनचे मुख्य द्वार, तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्म व पार्किंग एरिया, फुटओव्हर ब्रिज, शौचालायची स्थिती यांचे आकलन करण्यात आले. 

* याशिवाय प्लास्टिक वेस्टचा उपयोगही पाहण्यात आला. पियुष गोयल म्हणाले की यापुढेही जे स्टेशन चांगले काम करेल ते पुढे राहील. जे दुर्लक्ष करतील ते मागे राहतील. त्यामुळे सर्व स्टेशनचे स्वछतेकडे लक्ष द्यावे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.