सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

जगण्यासाठी सर्वात सुंदर शहरामध्ये पुणे देशात सर्वोत्तम शहर - १३ ऑगस्ट २०१८

जगण्यासाठी सर्वात सुंदर शहरामध्ये पुणे देशात सर्वोत्तम शहर - १३ ऑगस्ट २०१८

* विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याने आता देशात जगण्यासाठी सर्वात चांगल्या शहरांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत पुणे जगण्यासाठी सर्वाधिक चांगले शहर असल्याचे म्हटले आहे.

* केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने ही यादी प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे जगण्यासाठी योग्य अव्वल १० शहरामध्ये महाराष्ट्राच्या तीन शहरांचा समावेश आहे.

* या यादीत भारतातील जगण्यासाठी प्रथम १० शहरे अनुक्रमे १.पुणे, २. नवी मुंबई, ३. मुंबई, ४. तिरुपती, ५. चंदीगड, ६. ठाणे, ७. रायपूर, ८. इंदोर, ९. विजयवाडा, १०. भोपाळ असे आहेत.

* यामध्ये उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूतील एकाही शहराला अव्वल १० मध्ये स्थान मिळवता आले नाही. हे सर्वेक्षण देशातील १११ शहरामध्ये करण्यात आले.

* शहरांची निवड करताना संस्था, प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा यात शिक्षण आणि आरोग्य त्याचबरोबर आर्थिक घटक आणि पायाभूत सुविधा या घटकांचा विचार करण्यात आल्याचे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले.

* या यादीत चेन्नईला १४ वा क्रमांक मिळाला आहे. कोलकाताने सर्वेक्षणात भाग घेण्यास नकार दिला होता. मंत्रालयाने १११ मोठ्या शहरामध्ये सर्वेक्षण करून जारी केलेल्या यादीत राजधानी दिल्लीचा खालचा क्रमांक लागला आहे.

* सुरवातीला या सर्वेक्षणात ११६ शहरांचा समावेश करण्याची योजना होती. यामध्ये सर्व १०० स्मार्ट शहर आणि ज्या शहरांची लोकसंख्या १० लाखाहून अधिक होती अशांचा समावेश करण्यात आला होता.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.