रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचं निधन - १२ ऑगस्ट २०१८

नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचं निधन - १२ ऑगस्ट २०१८

* प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही एस नायपॉल यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. लंडनमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

* विद्याधर सुराजप्रसाद नायपॉल अर्थात व्ही एस नायपॉल यांनी ३० पेक्षा जास्त पुस्तकांचं लेखन केलं. २००१ मध्ये नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पुरस्कारही मिळाला.

* नायपॉल यांचा जन्म कॅरेबियन बेटावरच्या त्रिनिदात या देशात झाला होता. नायपॉल यांचे वडील प्रशासकीय सेवेत अधिकारी होते.

* ऑक्सफर्ड येथील महाविद्यालयात इंग्रजी विषयात पदवीशिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप मिळाल्यानंतर वयाच्या १८ वर्षी ते इंग्लंडला रवाना झाले. व पुढे त्याच देशात स्थायिक झाले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.