शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

आशियाई स्पर्धेचा भालाफेकपटू नीरज चोप्रा ध्वजवाहक - ११ ऑगस्ट २०१८

आशियाई स्पर्धेचा भालाफेकपटू नीरज चोप्रा ध्वजवाहक - ११ ऑगस्ट २०१८

* गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील यशानंतर भारतीय खेळाडू १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेम बांग येथे होणाऱ्या आशियाई पदके जिंकण्यास उत्सुक आहेत.

* स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा हा उदघाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक म्हणून दिसणार आहे.  भारतीय ऑलिम्पिक संघाचे आयओए अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी ही घोषणा केली.

* नीरज चोप्राने २०१६ मध्ये आयएएफ २० वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. २० वर्षाचा नीरज राष्ट्रकुल चॅम्पियन असून गेल्या महिन्यात फिनलँडमधील सावो येथे त्याने सुवर्णपदक जिंकले.

* २०१७ च्या ऍथलेटिक्स स्पर्धेतही त्याने ८५.२३ मीटर भालाफेक करीत सुवर्णपदक पटकाविले. याआधी झालेल्या २०१४ च्या आशियाई माजी हॉकी कर्णधार सरदारसिंग ध्वजवाहक होता.

* कोरियातील इंचीयोनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ११ सुवर्ण १० रौप्य आणि ३६ कास्य पदके एकूण ५७ पदकांची कमाई केली होती.

* राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारतीयांची एकूण १०१ पदकांची कमाई केली होती. तर २००२ मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये ६९ पदके मिळवली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.