शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी हरिवंश नारायण सिंह यांची निवड - १० ऑगस्ट २०१८

राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी हरिवंश नारायण सिंह यांची निवड - १० ऑगस्ट २०१८

* राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी संयुक्त जनता दलाचे भाजप पुरस्कृत उमेदवार व ज्येष्ठ संपादक हरिवंश नारायण सिंह यांची आज अपेक्षेप्रमाणे निवड झाली. 

* ते २० मतांनी विजयी झाले. सदनात उपस्थित असलेल्या २२२ सदस्यांपैकी हरिवंश नारायण सिंह यांना १२५ तर त्यांचे प्रतिस्पर्धी, काँग्रेसचे बी के हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली. 

* या निवडणुकीसाठी आलेले नऊ प्रस्ताव मांडल्यावर निवडणूक प्रक्रियेतील आवाजी मतदान झाले. मतविभाजन हरिवंश नारायण सिंह यांना पाठिंबा देणाऱ्या भाजप आघाडीचे अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. 

* बिजू जनता दल, शिवसेना, अण्णा द्रमुख यासारख्या पक्षांनी नितीशकुमार यांच्यासाठी हरिवंश नारायण सिंह  यांना पाठिंबा दिला. 

* माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे माध्यम सल्लागार म्हणून हरिवंश नारायण सिंह यांनी काम केले होते. पंतप्रधान मोदी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक वक्त्यांनी या दोन्ही बाबीचा उल्लेख केला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.