बुधवार, १ ऑगस्ट, २०१८

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर - ३१ जुलै २०१८

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर - ३१ जुलै २०१८

* रिझर्व्ह बँकेने बुधवारी पतधोरण जाहीर केले असून वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये पाव टक्क्याने वाढ करण्यात आली होती.

* रेपोरेटमध्ये वाढ झाल्याने कर्जदारांना याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. गृह वाहन तसेच वैयक्तिक कर्ज महागण्याची शक्यता आहे.

* रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरु झाली. समितीचा व्याजदर बदलाबाबतचा निर्णय बुधवारी जाहीर केला.

* २०१८-१९ मधील हे तिसरे द्विमासिक पतधोरण आहे. यापूर्वीच्या पतधोरणात जूनमध्ये मध्यवर्ती बँकेने पाव टक्का वाढ केली आहे.

* भारतीय बँका ज्या दरानं रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात त्याला रेपो रेट म्हणतात. तर बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे ठेवी ठेवल्यास त्यांना रिझर्व्ह बँकेकडून जो व्याजदर मिळतो त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.