सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

जानेवारी २०१९ पासून ७ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी - ६ ऑगस्ट २०१८

जानेवारी २०१९ पासून ७ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी - ६ ऑगस्ट २०१८

* राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा वेतनलाभ जानेवारी २०१९ पासून मिळणार आहे. वेतन आयोगाच्या लाभासोबतच २०१७ मधील थकीत महागाई भत्त्याची रक्कमदेखील देण्यात येईल. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

* वेतन आयोगाचा लाभ जानेवारी २०१६ या निर्धारित तारखेपासून देण्यात येणार आहे. मात्र सहाव्या वेतन आयोगात अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतनात अनेक त्रुट्या होत्या. 

* त्यावर के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करत असून ते अंतिम टप्प्यात आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

* वेतनवाढ आणि थकीत महागाई भत्ते या सर्व बाबीसाठी अंदाजे ४ हजार ८०० कोटी रुपयांची तरतूद उपलब्द करून देण्यात येणार आहे. ५ दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबतही शक्य तितक्या लवकर निर्णय घेईल. असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

* चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. त्यापूर्वी मुख्य सचिवांनी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना आणि शिक्षक संघटनासोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.