शनिवार, २१ जुलै, २०१८

मुद्रा योजना [MUDRA] - २१ जुलै २०१८

मुद्रा योजना [MUDRA] - २१ जुलै २०१८

* भारतभर अनेकविध प्रकारचे छोटे व्यवसायिक पसरलेले आहेत. त्यांना गरज आहे ती पतसंवर्धनाची. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत १४ कोटीच्या आसपास खाती उघडली गेली. 

* त्याचा विविध प्रकारे फायदा जनतेला आणि सरकारला होईल यासाठीचे पुढील पाऊल म्हणजे त्या खातेदारांच्या एकूणच राहणीमानाचा अंदाज घेऊन त्यात सुधारणा करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणे. 

* त्याच्यात जागृती बरोबर त्यांना अर्थसहाय्य पाहिजे. अर्थव्यवस्था खोलवर पोचते. बँकेत खाती ही केवळ सरकारी फायदे किंवा सबसिडी बँकेत जमा करण्यासाठी नसतात. 

* तर बँकेतून कर्ज घेण्यासाठी खात्यांचा उपयोग जास्तीत जास्त लोकांनी करून घेतला पाहिजे. तेव्हा कोठे खऱ्या अर्थाने बँकिंग सर्वदूर गेले म्हणतात येईल. 

* या छोट्या छोट्या उद्योजकांसाठी आखलेली पंतप्रधान मुद्रा योजना आहे. मुद्रा म्हणजेच मायक्रो युनिट्स डेव्हलोपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी [MUDRA- Micro Units Development Refinance Agency - Bank] रुपये २०००० कोटी रुपये भांडवल असलेल्या मुद्रा बँकेने अनावरण ८ एप्रिल २०१५ रोजी झाले.

* जागतिक पातळीवर सर्वोत्तम अभ्यास, मार्गदर्शन आणि एकात्मिक आर्थिक साहाय्य देऊन आधारभूत होणारी संस्था निर्मिती अशी दृष्टी आणि ध्येय समोर ठेवून मुद्रांची स्थापना करण्यात आली. त्याने भविष्यात उत्तम कारागिरी होताना दिसत आहे. मुद्रा ही सिडबी - Small Industries Development Bank of India यांची उपकंपनी म्हणून काम करते.

* सरकारद्वारे मोठ्या स्वरूपात अर्थसहाय्य उपल्बधता, योग्य नियोजन, मार्गदर्शन असे एकत्र आल्याने मुद्रास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

* त्याने स्वतंत्र सक्षम व्यवस्था निर्मिती झाली. मोठे उद्योग साधारणपणे सव्वा कोटी रोजगार निर्मिती करतात. तर छोटे म्हणवणारे उद्योग १२ कोटीच्या आसपास उद्योग निर्माण करणारे आहेत.

* देशात रोजगार संधी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. देशाच्या उत्पन्नात भरीव भर घालणारे एसएमई उद्योग वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिले होते. त्यांची भरभराट होण्यास मुद्रांद्वारे मिळणारा पतपुरवठा साहाय्यभूत आहे.

* या योजनेत शिशू व्यवसायात जास्तीत जास्त ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज, किशोर व्यवसाय ५०,००० ते ५ लाखापर्यंत अर्थसहाय्य, तरुण व्यवसाय - ५ लाख ते १० लाखापर्यंत कर्जमंजुरी.

* शिशू व्यवसाय - असा व्यवसाय म्हणजे नुकताच चालायला लागलेला, ज्याची सुरुवात झाली आहे. या पहिल्या महत्वाच्या टप्प्यावर अर्थसहाय्य मिळाले नाही. तर नाउमेद होऊन व्यवसाय बंद होण्याचीच शक्यता अधिक असते.

* किशोर व्यवसाय - किशोर अवस्थेत सुरु झालेला व्यवसाय सांभाळताना कसरत करावी लागते, दमछाक होते, परिस्थितीचा अंदाजही बांधता येईलच असे नसते. त्याने समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्याचवेळी आर्थिक पाठबळ मिळाले तर येणाऱ्या संधीचा फायदा घेता येतो. नवीन ऑर्डर्स असतील तर त्याची पूर्तता करता येते. यालाच धंद्यात जम बसविणे म्हणतात.

* तरुण व्यवसायिक - तरुण व्यवसायिक म्हणजे ज्याचा धंद्यात जम बसला आहे. आणि आता विस्ताराकडे वाटचाल होत आहे. विस्तार वाढविताना व्यवधाने ओळखून पसारा सांभाळताना होणारी तारांबळ सावरावी लागतेच. तेव्हाच मुद्राद्वारे मिळणारे कर्ज योग्य प्रकारे वापरता येते.

* नव्याने काहीतरी धडपड करणाऱ्या सर्वाना मुद्रामुळे दिलासा मिळालेला आहे. उमेद वाढली आहे, मी कोणीतरी आहे, चांगले काम करू शकतो, हा आत्मविश्वास व्यक्तीत व्यवसायात सकारात्मक बदल घडू शकतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.