शुक्रवार, २७ जुलै, २०१८

भारतात HIV बाधितांची संख्या लक्षणीयरित्या कमी - २६ जुलै २०१८

भारतात HIV बाधितांची संख्या लक्षणीयरित्या कमी - २६ जुलै २०१८

* गेल्या १० ते १२ वर्षात भारतातील एचआयव्ही बाधितांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. भारतात एचआयव्ही रोखण्याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे एचआयव्ही बाधितांची संख्या सुमारे ४० हजारांनी कमी झाली आहे.

* तर एचआयव्हीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही जवळपास एक लाखांनी कमी झाले आहे. मात्र फिलिपाइन्स आणि पाकिस्तानमध्ये एचआयव्ही बाधितांचे प्रमाण वाढतेच आहे.

* संयुक्त राष्ट्रसंघाच्या एचआयव्हीसंदर्भात कार्यरत असलेल्या सहयोगी संस्थेने यूएन एड्स जागतिक पातळीवरील माइल्स टू गो हा अहवाल नुकताच जाहीर केला. या अहवालात २०१० ते २०१७ दरम्यानची एचआयव्ही संबंधित आकडेवारी देण्यात आली आहे.

* जागतिक पातळीवर एचआयव्ही रोखण्यासाठी अपेक्षित वेगाने काम होत नसल्याची धोक्याची घंटा या अहवालाद्वारे बजावण्यात आली आहे.

* भारतासह कंबोडिया, थायलंड, म्यानमार आणि व्हिएतनाम या देशांनी विशेष लक्ष दिल्यामुळे २०१० च्या तुलनेत २०१७ मधील एचआयव्ही बाधितांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे.

* भारतात २०१० मध्ये एचआयव्ही आढळून आलेल्या नव्या रुग्णाचे प्रमाण जवळपास १ लाख ६० हजारवरून ६९ हजार इतके कमी झाले.  तर एचआयव्ही सह जगणाऱ्यांचे प्रमाण २३ लाखावरून २१ लाखावर आल्याचे अहवालाद्वारे स्पष्ट झाले. 

* जागतिक पातळीवर गेल्या सात वर्षांमध्ये एचआयव्ही बाधितांचे प्रमाण केवळ १८ टक्क्यांनी कमी झाले. २०१० मध्ये एचआयव्ही बाधितांची संख्या २२ लाख होती.

* २०१७ मध्ये ती १८ लाखावर आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहेत. नव्या एचआयव्ही बाधितांपैकी ९७ टक्के रुग्ण पूर्व युरोप आणि मध्य आशियातील आहेत.

* एचआयव्ही रोखण्यासाठी जागतिक पातळीवर ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टांचा वेग साधण्यात अपयश येत आहे. त्यामुळे हा अहवाल म्हणजे जगभरातील देशासाठी धोक्याची घंटा आहे. एचआयव्ही रोखण्याच्या दृष्टीने त्वरित उपाय शोधण्याची गरज आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.