शुक्रवार, ६ जुलै, २०१८

कर्नाटकात २ लाखापर्यंत कर्जमाफी - ६ जुलै २०१८

कर्नाटकात २ लाखापर्यंत कर्जमाफी - ६ जुलै २०१८

* काँग्रेसधर्मनिरपेक्ष जनता दल जेडीएस सरकारने २ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफी करण्याची घोषणा करून शेतकरीवर्गाला दिलासा दिला. कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात ३४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

* कर्जमाफीची तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल, डिझेल, वीज व मद्यावरील सेस वाढविण्यात आला आहे. अर्थ खाते सांभाळणारे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आज २०१८-१९ आर्थिक वर्षासाठी २,१३,७३४ लाख कोटी रुपयाचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे.

* यासाठी कर्जमाफीसाठी ६५०० कोटीची तरतूद केली आहे. इंदिरा कँटीनसाठी २११ कोटी रुपयांचे अनुदान राखीव ठेवण्यात आले आहे.

* शेतकऱ्यांसाठी इस्त्राईलच्या धर्तीवर कृषी पद्धतीसाठी १५० कोटी रुपये अनुदान राखीव ठेवण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.