सोमवार, १६ जुलै, २०१८

महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक २०१८ विधानपरिषदेत मंजूर - १४ जुलै २०१८

महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक २०१८ विधानपरिषदेत मंजूर - १४ जुलै २०१८

* महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक २०१८ विधानपरिषदेत मंजूरी देण्यात आली आहे. राज्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्ते प्रकल्पासाठी भूमिधारकाना चौपट मोबदला देऊन भूसंपादन करण्याबाबतच हे विधेयक आहे.

* या कायद्यातल्या तरतुदीनुसार रस्ते प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या राज्यातल्या भूमिधारकांना केंद्र सरकारच्या २०१३ च्या कायद्याप्रमाणे चौपट मोबदला मिळणार असून सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधेयक मांडताना सभागृहात सांगितलं आहे.

* या विधेयकामुळे महामार्गामुळे जमीन गमावणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना मोठा फायदा होणार आहे. तसेच अधिग्रहण करताना शासनाला येणाऱ्या अडचणीही कमी होणार आहेत.

* ग्रामीण भागातील जमीन सार्वजनिक कामासाठी संपादित केल्यास त्याबदल्यात जमीन मालकाला बाजारभावाच्या ४ पट मोबदला देण्याचा निर्णय १७ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

* राज्यात भूसंपादन कायद्यानुसार खाजगी जमिनीचे संपादन करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील जमिनीसाठी भूसंपादनासाठी बाजारभावाच्या चार पट रक्कम देण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास आज मान्यता देण्यात आली होती.

* त्यामुळे ग्रामीण भागातील जमीन धारकांना चार पट मोबदला मिळण्याचा मार्ग याआधीच मोकळा झाला होता. या निर्णयानुसार भूसंपादन अधिनियम-२०१३ मधील कलम १०५ व शेड्युल ५ मध्ये राज्यातील चार कायद्याचा समावेश करण्यात आला आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.