शुक्रवार, २० जुलै, २०१८

राज्यातील बाजार समित्यात सौरप्रकल्प योजना - २० जुलै २०१८

राज्यातील बाजार समित्यात सौरप्रकल्प योजना - २० जुलै २०१८

* राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा वीज खर्च वाचविण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याची योजना पणन मंडळाने आखली आहे. अतिरिक्त विजेची विक्री करून समित्यांमध्ये उत्पन्न वाढविण्याचे नियोजन आहे.

* पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रमुख २० बाजार समित्यांमध्ये महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण विभागाच्या [मेडा] मार्गदर्शनाखाली ही योजना राबविली जाईल. या प्रकल्पामुळे बाजार समित्यांच्या वीजबिलात बचत होईल.

* त्याचप्रमाणे जर त्यातून अतिरिक्त वीज निर्माण झाली तर वीज विक्रीतून बाजार समित्यांना वीजबिलात बचत होईल.

* राज्यात ३०७ बाजार समित्या आणि ५९७ उपबाजार आहेत. पुणे, मुंबई आदींसारख्या बाजार समित्यांच्या आवारात विविध इमारती आणि रिकाम्या जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारता येऊ शकतात.

* प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प - बाजार समित्या - नागपूर, कामठी, पुणे, बारामती, कोल्हापूर, जयसिंगपूर, नाशिक, दिंडोरी, औरंगाबाद, खुलताबाद, अमरावती, धामणगाव रेल्वे, मुंबई, पनवेल, लातूर, औसा, अकोला, अकोट, चंद्रपूर, गोंडपिंप्री. या बाजार समितीत पहिल्या टप्यात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.