शुक्रवार, ६ जुलै, २०१८

क्रू एस्केप सिस्टीमची इस्रोकडून यशस्वी चाचणी - ६ जुलै २०१८

क्रू एस्केप सिस्टीमची इस्रोकडून यशस्वी चाचणी - ६ जुलै २०१८

* आपत्तीच्या काळात अंतराळवीरांचा जीव वाचविण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या क्रू एस्केप सिस्टीमची यशस्वी चाचणी आज भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या इस्रो शास्त्रज्ञानी घेतली.

* या यंत्रणेची ही पहिली चाचणी होती. यानाचे प्रक्षेपण अयशस्वी झाल्यानंतर अंतराळवीराना यानातून बाहेर पाडण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे.

* या यंत्रणेच्या चाचणीसाठी पाच तासांची उलटगणती घेण्यात आली. त्यानंतर अंतराळवीरांच्या पुतळ्यांना घेऊन क्रू एक्सेप सिस्टीम च्या मॉड्यूलचे आज सकाळी सात वाजता सोडण्यात आले.

* ही चाचणी सुमारे २५१ सेकंद चालली. नंतर चाचणी कुपी बंगालच्या उपसागरात पाडण्यात आली. सुमारे २.९ किलोमीटरचे अंतर पार करून ती कुपी श्रीहरीकोटाला पोचली.

* मानवाला अंतराळात पाठविण्याच्या भारताच्या स्वदेशी मोहिमेतील ही चाचणी महत्वाचा टप्पा आहे असे इस्रोने म्हटले आहे. फेरवापर करता येणाऱ्या कुपीची आरएलव्ही इस्रोने यापूर्वीच चाचणी घेतली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.