सोमवार, ९ जुलै, २०१८

श्रीमंतांच्या यादीत मार्क झुकरबर्ग तिसऱ्या स्थानावर - ८ जुलै २०१८

श्रीमंतांच्या यादीत मार्क झुकरबर्ग तिसऱ्या स्थानावर - ८ जुलै २०१८

* फेसबुकचे संस्थापक ३४ वर्षीय मार्क झुकरबर्ग यांनी गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.

* ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सने ही यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये, अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे दोघे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत.

* फेसबुकच्या शेअरमध्ये २.४ टक्के वाढ झाल्याने  झुकरबर्गच्या संपत्तीत वाढ होऊन ती ८१.६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. झुकरबर्कची संपत्ती बफे यांच्या संपत्तीपेक्षा ३७३ मिलियन डॉलर अधिक आहे.

* यावर्षी फेसबुकला डेटा लीक केल्याच्या आरोपाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मार्च २०१८ मध्ये फेसबुकच्या शेअर्सच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती.

* वॉरेन बफे यांनी बर्कशायर हाथवे कंपनीचे ब श्रेणीचे समभाग गेट्स फाउंडेशनला दान केले. त्यामुळे त्यांच्याकडील संपत्ती कमी झाली आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.