शनिवार, २१ जुलै, २०१८

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात - २० जुलै २०१८

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात - २० जुलै २०१८

* देशात सर्वाधिक शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. देशात २०१६ साली शेतकरी व शेतमजूर मिळून ११,३७० जणांनी आत्महत्या केली.

* त्यातील ३६६१ महाराष्ट्रातील होते. ही धक्कादायक आकडेवारी सरकारने संसदेत दिली. राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण ब्युरोने एनसीआरबी २०१६ साठी शेतकऱ्यांच्या आत्महत्याशी संबंधित हंगामी माहिती दिली.

* या अहवालात म्हटले आहे की महाराष्ट्रानंतर कर्नाटक राज्य आहे. तेथे २०७९ शेतकरी व शेतमजुरांची आत्महत्या केली. तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे. तेथे २०१६ मध्ये शेतकरी व शेतमजूर मिळून १३२१ आत्महत्या झाल्या आहेत.

* वेगवेगळ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्तही असू शकतात. कारण ही तात्पुरती आकडेवारी आहे. सविस्तर अहवाल बनवण्यासाठी आणखी बारकाईने अभ्यास केल्यास आकड्यात बदल होऊ शकत नाही.

* शेतकरी आत्महत्येचा विषय संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत अनेक सदस्यांनी उपस्थित केला. एनसीआरबीने दिलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शेतीच्या कामात सक्रिय असलेले ११११ मजूर आणि २५५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

* गोव्यात फक्त एका शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. देशात ८ राज्यात व केंद्रशासित प्रदेशात याच कालावधीत एकही अशी आत्महत्या झाल्याचे समोर आलेले नाही.

* ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात बिहार, लक्षद्वीप, दमण-दीव, दादरा नगर हवेली, चंदीगड, दिल्ली, पश्चिम बंगाल, नागालँडचा समावेश आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.